Header Ads Widget

हिप्परगा येथे भिमा कोरेगांव शौर्य स्तंभ प्रतिकृती निर्माण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानाची मानवंदना

     
       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे भिमा कोरेगांव शौर्य गाथा २०५ व्या दिनाच्या निमित्ताने समाज बांधवाच्या मानाची मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जि.प  सदस्यां डॉ मीनाक्षी कागडे यांचे प्रतिनिधी नामांकित डॉ शिवाजी कागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलेमौजे हिप्परगा येथे समाज बांधवाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रतिकृती भिमा कोरेगांव शौर्य स्तंभाला समता सैनिक दलाच्या वतीने मानाची मानवंदना देण्यात आली यावेळी उपासक किशनराव पवार यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले आहे 
--------------------------------------------------------------------  तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे कार्यक्रमाच्या या प्रसंगी डॉ शिवाजी कागडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले ज्या ५०० शुरविरांनी आपली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्राण पणाला लावले व २८ हजार पेशव्यांच्या सैन्याला हरवले म्हणून आपली गुलामगिरी नष्ट झाली आपले पुर्वज प्राण पणाने लढले आहे
शौर्याचा इतिहास निर्माण केला असल्यामुळे या शुरविरांना मानाची मानवंदना देण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी १ जानेवारी जानेवारी रोजी ला भिमा कोरेगांवला जात होते हा दिवस सर्व भारतभर भिमा कोरेगांव शौर्य गाथा दिवस म्हणून साजरा केला जातो ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ कागडे म्हणाले आहे

याप्रसंगी समता सैनिक दलाचे प्रमुख भीमराव पवार सुधाकर पवार , सैनिक सोनसळे, भावी सरपंच हिप्परगा संभाजी पवार गणपती केरबाजी पवार ,राहुल पवार, विठ्ठल हनुमंते, दिगंबर पवार, आकाश वाघमारे ,भीमराव वाघमारे , संजय पवार संभाजी पवार, भुजंग पवार, प्रकाश पवार, भिमाबाई किशन पवार, गौतम पवार, गौतम वाघमारे,नागेश पवार, गणपती गगांराम पवार मोठ्या संख्येने समता सैनिक दलाच्या महिला पदाधिकारी व बंधू भगिनीं उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश वाघमारे यांनी केले

Post a Comment

0 Comments