माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा शासनाने तूटपुंज्या निधीच्या माध्यमातून खडे बुजविण्याचे काम टेबुर्णीच्या गुत्तेदाराने निदान सहा महिने तरी रस्ता टिकेल अशा पद्धतीने गिटी व मुरूम टाकून पाण्याची दबई करून रस्ता दुरुस्त केला होता परंतु कुंटूरकर शुगर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे सदरच्या रस्त्याची पुन्हा एकदा वाट लागली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेत
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे बेवारस बनला होता या रस्त्याकडे सदरच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते हा रस्ता भविष्यात होणार की नाही असा ही प्रश्न चर्चेला जात असून ह्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांचे ही जाणून बुजून दुर्लक्ष झाले की काय असा ही प्रश्न अनेकातून केला जात आहेघुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून मोठा असल्यामुळे व तीन ते चार तालुक्याला जोडलेला रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांचे बेदखल दुर्लक्ष झाले असल्यामुळे या रस्त्याची दयनिय अवस्था परत एकदा होत असल्याचे चित्र दिसून येते सदरच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सदरचा रस्ता करण्यासाठी डांबरीकरणाला मंजुरी दिल्यास निदान दोन तरी वर्ष वाहतुकीसाठी योग्य ठरेल असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
कुंटूरकर शुगर कारखान्याच्या यंत्रनेने कारखान्याला ऊस आणण्याचा दृष्टिकोनातून सदरच्या रस्त्यावर ट्रकच्या साह्याने व ट्रॅक्टरच्या दोन दोन ट्राल्या लावून ऊस वाहतूक केली जात असल्यामुळे साधारण बनवलेल्या रस्त्याची वाईट अवस्था होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असली तरी सदरच्या कारखानदाराने या रस्त्यावर पाणी टाकत नसल्याने परत एकदा रस्त्याची विल्हेवाट लागत असल्याचे दिसून येत आहेगेल्या २५ ते ३० वर्षाखाली नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर आरटीओचा दौरा दर महिन्याच्या १९ ते २० तारखेला राहात असल्यामुळे या रस्त्यावर ये जा करणारे जड वाहने आरटीओच्या धास्तीने अधिकारी येत असल्याचे कळताच जागोजागी ट्रक थांबून ठेवत होते परंतु आता आरटीओच्या समोरच जड वहानाची वाहतूक होत असताना सुद्धा आरटीओ विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत
नांदेड ते हैद्राबाद राज्या महामार्गावर शासकीय राऊंड मारत असताना दिसून येत असली तरी घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर जड ओव्हरलोड ऊसाची वाहतूक होत असताना सुद्धा नजर कानडी करत असल्याचे ही दिसून येत आहेत

0 Comments