Header Ads Widget

बरबडा येथील सहशिक्षक माधव मारोती बच्चेवार यांना राज्यस्तरीय "क्रिडारत्न पुरस्कार " जाहिर


बरबडा :-किरण हणमंते :-


बरबडा येथील रहिवाशी आहेत ते किसान विद्यालय उमरा ता. लोहा जि. नांदेड या ठिकाणी कार्यरत असणारे सहशिक्षक माधव मारोती बच्चेवार यांना राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे. त्यांनी आजवर क्रिडा क्षेत्रात आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिष्ठा फॉउंडेशन च्या वतीने जाहीर करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
---------------------------------------------------------------------
हा पुरस्कार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता समृद्धी मल्टीपर्पज हॉल तासगाव येथे होणाऱ्या सातव्या राज्यस्तरीय प्रतिष्ठा साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक पाणी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते  देणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर मित्र परिवार नातेवाईक आणि सहकारी व गावकरी यांच्या कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments