बरबडा येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, सेवा सहकारी सोसायटी, मार्केट कमिटी, पोलिस आऊट स्टेशन बरबडा, ग्रामिण बँक आणि जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा या सहित आंतरगाव, मनुर, इज्जतगांव, रुई, टाकळी, वजीरगाव, पाटोदा, कहाळा (खु.), कहाळा (बु.), मांडणी, सोमठाणा, कृष्णूर इत्यादी ठिकाणी ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठया थाटात साजरा करण्यात आला.
जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती.
ग्रामपंचायत येथे सरपंच माधव कोलगाने यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. नंतर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले आणि उपसरपंच सौ. छायाताई धर्माधिकारी, ग्रामपंचायत सदस्य बालाजीराव धर्माधिकारी, सतिश शिंगेवाड, बाबु इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, गंगाधर रुद्रवाड, पांडुरंग एडके आदी उपस्थितीत होते
जवाहरलाल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, सदाशिवराव धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजी मदेवाड, माजी सरपंच नागनाथ हनमंते, शिवाजीराव धर्माधिकारी, माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे, दवाखान्यातील डॉक्टर आणि ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, पोलिस उपनिरीक्षक रमेश निखाते, जमादार लक्ष्मण सोनकांबळे पोलिस कर्मचारी कंधारे आदी उपस्थितीत होते
पोलिस पाटिल प्रतिनिधी संजय कानगुले, सेवा सहकारी सोसायटी चे सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर, ग्राम संघाच्या महिला, बचत गटाच्या महिला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती होती. नंतर ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रिय शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन शालेय शिक्षण समिती तर्फे वहि पेन चे वाटप करण्यात आले आहे. या वेळी केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक खंदारे आदी उपस्थितीत होते
जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती चे अध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष साईनाथ पवार, कन्या शाळेचे शालेय समिती चे अध्यक्ष सदानंद आनेमवाड, उपाध्यक्ष दत्ता जेटेवाड, दत्ता भंडरवाड, श्रीराम शिंदे, काशीराम पोतनवार, जनाजी सूर्यवंशी, अमोल विठ्ठलकर, इसाक शेख, संतोष गडपे, पांडुरंग गंजेवार, सदाशिव धर्माधिकारी, माधव जंगीलवाड, महेश आनेमवाड, सतिश हणमंते आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थितीत होते.

0 Comments