Header Ads Widget

प्रजासत्ताक दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा


बरबडा : किरण हणमंते

जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन वर्ग सजावट, ज्युनिअर कॉलेजच्या वतीने ह.भ.प. दिगंबररावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भित्ती पत्रकाचे अनावरण संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

वर्ग सजावटीचे निरीक्षक करताना संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बरबडा नगगरी सरपंच माधवराव कोलगाने, उपसरपंच सौ. छायाताई धर्माधिकारी बरबडेकर, बालाजीराव धर्माधिकारी,‌सेवा निवृत‌ प्रा. रुद्रवाड पी.जी., विश्वाभंर शिंगेवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश शिंगेवाड, बाबु मामा इंद्रवाड, प्रकाशराव धर्माधिकारी, शंकर पाटील पचलिंग, सदाशिव पाटील पचलिंग, संजय पाटील पचलिंग,  ज्ञानेश्वर सुरेवाड , विलास पचलिंग, दत्ता पाटील गीरे , व्यंकटी पाटील गीरे, बाबु पाटील शेवाळे, पत्रकार किरण हनमंते आदी उपस्थितीत

विशाल धर्माधिकारी,शाकीर शेख व गावातील माजी विद्यार्थी व‌ सुजाण नागरिक उपस्थित होते. वर्ग सजावटीसाठी निरीक्षक म्हणून प्रा.तगडपल्लेवार‌ सर‌,प्रा.व्यंकट सोळंके सर, भुसलवाड सर , इंजेवाड सर‌ यांनी काम पाहिले त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या २१ जानेवारी ते २६ जानेवारी सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध शालेय उपक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. या  कार्यक्रमाचे‌ उद्दघाटन संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हस्ते करण्यात आले

तर त्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर तर पाहुणे म्हणून पोलिस जमादार सोनकांबळे त्यांचे सहकारी कंधारे , शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे पर्यवेक्षक सुर्यकांत फड, ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक वसंत शिंदे , प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, सहशिक्षक दिलीपराव सर्जे  उपस्थित होते . या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा आविष्कार दाखविला आहे

त्याला प्रचंड प्रतिसाद रसीक यांनी दिला आपले नृत्य श्रोत्यांसमोर सादर केले. यामध्ये लावणी, देशभक्ती गित, शेतकरी गित, रॉक सॉंग, रिमिक्स, एकांकी नाटक असे विविध गित घेण्यात आले. अंबे कृपा करी, शेतकरी गित, नटरंग, बॅक बेंचर्स फनी डान्स, बेटी बचाव बेटी पढाव,  माय मराठी, मल्हारी मल्हारी, तेरी मिटी मे मिल जावा, ललाटी भंडार, झुमकावली पोर, जिजाऊ गित प्रतीक्षा ढगे, उजमा शेख यांनी गित गायन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी हंबर्डे, प्रा.खानापुरे, सहशिक्षिका विद्या हनमंते यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियंत्रण राखण्याचे काम एस.एन.सर्जे , प्रा.मुदखेडे, माधव  कंडापल्ले , क्रिडा शिक्षक कैलास पवार , सुर्यकांत गायकवाड, कपिलेश्वर मद्देवाड, अशोक बक्केवाड यांच्या सहित या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेऊन हा महोत्सव यशस्वी केला.


Post a Comment

0 Comments