नायगाव तालुक्यातील अनेक भागात अवैध मुरमांचे उत्खलन
तहसील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून अवैध मुरमाचे उत्खलन होत होते परंतु नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी मागील काही दिवसाखाली अवैध मातीचे व दगडाचे मुरुमाचे रेतीचे उत्कलन होत असल्यास त्यांच्यावर दांडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता
---------------------------------------------------------------------
तहसीलदार गजानन शिंदे यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून महसूल प्रशासनाला दंडात्मक कारवाई दंड आकारण्यात येईल व प्रशासनाची तिजोरी भक्कम करण्याच्या निर्णय घेतला होतात्या नुसार कार्यवाही करण्यासाठी नायगावचे तहसील प्रशासन कडक मोहीम हाती घेतले असल्यामुळे कृष्णूर विभागात एका अवैधरित्या मुरमाची वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर छापा मारून कारवाही करण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले असल्याचे सांगण्यात येते
तहसीलदाराच्या तावडीत सापडलेल्या सदरील लाल रंगाचा टिप्पर क्रमांक एम एच २६ एच ८१०६ हा अवैध मुरुमाची वाहतूक करताना तहसीलदाराच्या तावडीत आडकाला सदरच्या कारवाई दरम्यान महसूल विभागाचे शेख ईनुस, लक्ष्मण अनमवाड, दीपक वाघमारे, सुधाकर डोईवाड, चालक पुरी हे होते असे सांगण्यात आले आहे तालुक्यातील कृष्णुर येथील औद्योगिक वसाहत एमआयडीसी अंतर्गत लागणाऱ्या कंपन्याला मोठ्या प्रमाणात मुरमाची आवश्यकता असल्यामुळे मुरुमाचे अवैध उत्खलन करणारी टोळके अखेर नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या तावडीत सापडले असल्यामुळे सदरच्या टिप्पर वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी आमचे प्रतिनिधी रामराव पाटील ढगे यांच्याशी बोलताना सांगितले आहे

0 Comments