Header Ads Widget

रमाई आवास योजनेच्या घरकुल हजरी पटावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कृष्णूरच्या ग्रामसेवकाची आडकाठी गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज - मागणी

       माधव पवार
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांनी रमाई आवास योजनेचे घरकुले असो की पंतप्रधान योजने अंतर्गत घरकुल असो घरकुल धारकांना चांगल्या दर्जेचे घरकुल बांधून घेण्यासाठी सूचना करतात तर कृष्णुर येथील वादग्रस्त असलेले व अनेक वर्षा पासून याच गावात कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी एम एम शेख यांची मनामनी वाढली आहे
---------------------------------------------------------------------
रमाई आवास योजनेच्या हजरी पटावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी सदरचा ग्रामविकास अधिकारी चालढकल करत असल्यामुळे या गावातील लाभार्थी चांगलेच वैतागले असल्याचे सांगण्यात येत आहे
पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गविकास अधिकारी एल आर वादे यांनी घरकुल बांधत असलेल्या लाभार्थ्यांना बिले दिले देण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु या गावातील ग्रामविकास अधिकारी एम एम शेख यांनी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मिळणारे शासनाच्या मार्फत १८ हजार रुपये घरकुल धारकांना त्या हजरी पटावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी आडकाठी टाकत असल्याचे या गावात चर्चा होताना ऐकावयास मिळत असून या बाबीकडे गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहेतालुक्यातील कृष्णूर येथे रमाई आवास योजने अंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांना २० ते २५ घरकुल मिळाले आहेत त्या घरकुलावर काम करणाऱ्या मजुरांना शासना कडून अर्थात पंचायत समिती कडून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकूण १८ हाजार रुपये शासन कडून दिले जात आहेत परंतु येथील ग्रामविकास अधिकाऱ्यानी सह्य करण्यासाठी काय ? मागत असावे अधिकाऱ्यानी जास्तीचे लक्ष देण्याची मागणी होत आहे 

रमाई आवास योजनेच्या घरकुल हजरी पटावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कृष्णूरच्या ग्रामसेवकाची आडकाठी गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरित आहे 

परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्या कडून हजरी पटावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी का ? टाळाटाळ करत आहे हा महत्वाचा प्रश्न भेडसावत असून सदरचे गोरगरीब लाभार्थी १८ हजारा पासून वंचित राहतात की काय ? असा प्रश्न येथील घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना पडला असला तरी याच गावात दहा ते पंधरा घरे लाभ धारकांना डबल आल्याचे कारण लावून ह्या ग्रामविकांस अधिकाऱ्यानी घरकुले वापस केल्याची ही चर्चा आहे


Post a Comment

0 Comments