नागोराव शिंदे पळसपुरकर :--
उपवन रक्षक परिक्षेत्र अधिकारी नांदेड यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर यांच्या बेजबाबदारपणामुळे हिमायतनगर तालुक्यात रान डुकरांचा मोठा सुळसुळाट झाला असल्यामुळे तालुक्यातील टेंभी येथील एका शेतकऱ्यांसह त्यांच्या पत्नीवर रानडुकराने हाला चढून असल्याने दोघे ही पती-पत्नी गंभीर जखमी झाली आहेत
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी यांनी सांगितले आहे
तालुक्यातील टेंभी येथील रहिवासी असलेल्या या गावाच्या शिवारात आपल्या स्वतःच्या शेता काम करत असताना गट नंबर २०६ मध्ये सायंकाळच्या चारच्या सुमारामध्ये आपल्या शेतात दिनांक २८ जानेवारी २०२३ अचानकपणे रानडुकराच्या कळपाने शेतमजुरासह त्यांच्या सौभाग्यवतीवर हल्ला चढविला असल्याची माहिती मिळते आहेरानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतकरी शंकर दादाराव सुरोशे वय ३१ वर्षे आणि त्यांची पत्नी सौ निकिता
सुरोशे वय वर्षी २२ हे शेतामध्ये काम करत होते परंतु अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उजव्या छाती वर रानडुक्करानी गंभीर जखमी केले आहे
तर त्यांच्या पत्नीच्या शरीरावर उजव्या बाजूला मोठी जखम झाल्याने सांगण्यात येते त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
वन परीक्षत्र अधिकारी हिमायतनगर यांनी वन विभागाच्या मार्फत तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावेत अशी मागणी या भागातील जनतेतून बोलल्या जात असले तरी वनविभागाचा एक ही अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी आले नसल्याचे शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त केला जात आहें

0 Comments