Header Ads Widget

नायगाव तालुक्यात शासकीय व निमशासकीय कार्यालयासह विविध शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा


नायगाव फास्ट न्यूज : दिंगाबर मुदखेड 

नायगाव तालुक्यासह देशभरात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण साजरा केला जातो त्यामध्ये शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेतालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा व कै मोहनरावजी देशमुख हायस्कूल सुजलेगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असून त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगाव येथे नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय आईलवार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला आहे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुजलेगाव येथे मुख्याध्यापक एम.जी गादेवार तर कै.मोहनरावजी देशमुख हायस्कूल सुजलेगाव मुख्याध्यापक व्ही,एस. नकाते यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला आहेजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कै मोहनरावजी देशमुख हायस्कूल सुजलेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहें

त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय आईलवार होते तर गावातील प्रतिष्ठित नागरिक व उपसरपंच सुधाकर बकवाड माजी सरपंच बाबुराव कुऱ्हाडे माजी सरपंच गंगाधर देवाले ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे हनमंत बोटलावार संजय सूर्यकार नितीन वाघमारे शिवाजी ताटे आदी यावेळी उपस्थितीत होतेतंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्यासह गावातील आरोग्य सेवक सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी-माजी पदाधिकारी शाळेची माजी विद्यार्थी उपस्थित होते

यावेळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी वर्गात प्रथम येणाऱ्या व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मार्फत व गावऱ्याच्या वतीने त्यांना पारितोषिक दिले जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती वाढावी विद्यार्थ्यांना परीक्षा बद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विविध मान्यवरांच्या हस्ते व विविध व्यक्तींच्या स्मरणार्थ बक्षीस वितरण करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments