Header Ads Widget

घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात आराध्य दैवत महर्षी मार्कण्डेय यांची जयंती साजरी सरपंच प्रतिनिधी महोनराव जोगेवार यांची माहिती -

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा नगरीसह ग्रामपंचायत पंचायत कार्यालयात पद्मशाली बांधवाचे आराध्य दैवत असलेले महर्षी मार्कण्डेय यांची जयंती समाज बांधवासह गावकऱ्यानी उत्साहात साजरी करण्यात आली आह

अशा महा पुरुषाच्या जयंत्या घुंगराळा गावांत समस्त गावकऱ्याच्या मार्फत साजऱ्या केल्या जातात अशी माहिती गावाच्या महिला सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांचे प्रतिनिधी महोनराव जोगेवार यांनी दिली आहे
यावेळी महोनराव जोगेवार माजी उपसरपंच भगवानराव पाटील सुगावे देविदास पाटील सुगावे बालाजी तूरटवाड अजीम टेलर राजेश आलेगटलेवार माधव कंचलवाड गंगाधर बादलवाड पांडुरंग मेलफदवार नारायण गुरुपवार चंद्रसेन गंगासागरे माधव जलदेवार माधव गुरुपवार गजानन जलदेवार गणेश सुंकेवार अंकुश जलदेवार ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी बाजीराव पाटील ढगे रामचंद्र पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित होते

मार्कंडेय पुराण : हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे ह्या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले असून प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी आहेत महाभारताच्या संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव ऋषींच्या वंशातील हे मार्कंडेय ऋषी होते हे पुराण प्राचीन असून ह्याचा काळ साधारण पणे इ स ३ शतक असावा गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ. स. च्या चौथ्या-पाचव्या शतकात गोदावरीच्या उगम प्रदेशात लिहिले गेले असावे असे सांगण्यात येते

Post a Comment

0 Comments