Header Ads Widget

सोमठाणा येथील मास्टर दिनानाथ विद्यालयामध्ये सायबर सिक्युरिटी जनजागृती इव्हेन्ट संपन्न


बरबडा :- किरण हणमंते - 

सोमठाणा येथील मास्टर दिनानाथ विद्यालयामध्ये सायबर सिक्युरिटी जनजागृती इव्हेन्ट संपन्न येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर  विद्यालयामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व पोलिस स्टेशन कुंटूर तसेच ओम कंप्युटर कहाळा (खु.) यांच्या वतीने आयोजित सायबर सिक्युरिटी इव्हेंट घेण्यात आला आहेव्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वरवठे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य मनोहर पवार, कुंटूर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक महादेव पुरी, एम.के.सी.एल.नांदेड चे अखिल सय्यद,कंप्युटर सेंटर चे संस्थाचालक विजय पांचाळ उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार शाल व हार घालुन ओम कंप्युटर चे संचालक विजय पांचाळ यांनी केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओम कंप्युटर चे संचालक विजय पांचाळ यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक महादेव पुरी यांनी होणाऱ्या गुन्ह्या बद्दल माहिती दिली आणि सायबर पासुन सुरक्षित राहण्यासाठी काय करावे लागेल व नक्कीच कळत नकळत होणाऱ्या चुका मोबाईल च्या माध्यमातून टाळण्यासाठी सुरक्षा महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले

सोशल मीडिया च्या माध्यमातुन कोणाच्याही भावना न दुखावणे, ते दुखावल्यास काही आक्षेपार्ह चॅटिंग मॅसेज केल्यास, व्हिडीओ, विचित्र व्यंग फोटो पोस्ट केल्यास कलमान्वये गुन्ह्यास पात्र होतो म्हणुन विद्यार्थ्याने चांगल्या रितीने मोबाईल हाताळला पाहिजे असे सांगितले तसेच त्यामधून खेळले जाणारे पबजी सारखे गेम खेळू नये म्हणुन सिक्युरिटी असणे गरजेचे आहे. तसेच कायदा हातात न घेण्याचे याबाबत ची जनजागृती करणे विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर पालकांचे आणि नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments