Header Ads Widget

माळ ईकळी येथे वंचित बहुजन आघाडीची पाटी लावण्याच्या करणा वरून गावात तणाव ? आयपीएस अर्चित चांडसह तहसीलदार गजानन शिंदे सपोनि महादेव पुरी घटनास्थळी दाखल !!


  
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील माळईकळी हे गाव कॊणत्या न कोणत्या करणा वरून नेहमी चर्चेत असते परंतु या गावांत वंचित बहुजन आघाडीची पाटी लावण्याच्या करणा वरून दलित व सुवर्णात झालेल्या वादामुळे गावात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह ठाण्याचे सपोनि महादेव पुरी फौजदार संजय अटकोरे मोठा पोलीस फाटा बोलावला होता आहे
---------------------------------------------------------------------
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत माळईकळी येथे झालेल्या वादाची यावेळी गोपनीय शाखेचे अभिजित पाटील यांनी सुरुवातीला परिस्थिती हाताळली आहे
-------------------------------------------------------------------
वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर एच पालमकर हे या सकाळी साडे दहा वाजता इकळीमाळ येथे समस्या जाणून घेण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येते परंतु जिल्हाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ही सांगण्यात येते 
-------------------------------------------------------------------
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी व मंडळधिकारी शेख लथीफ ग्रामसेवक मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीची पाटी पोलीस बंदोबस्त काढले असल्यामुळे गावांत तणाव पूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या माळ इकळी येथे सदरचा दलित सुवर्ण वाद निर्माण झाला असल्यामुळे सदर वाद कायम स्वरूपी मिटवा म्हणून बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह तहसीलदार गजानन शिंदे सपोनि महादेव पुरी यांनी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments