विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे
तालुक्यातील मांजरम येथील हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेली गैपिर बाबा ची यात्रा आज दि.१३ जानेवारी रोजी भरणार असून या निमित्त जंगी कुस्त्याच्या फड भवरविला जाणार असून याचे सुरेख नियोजन यात्रा समिती व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मांजरम येथील गैपिर बाबा यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहे.या यात्रेचा संदल दरवर्षी मठपती घरण्यातून वाजत गाजत निघतो आहे
या मध्ये मुस्लिम बांधवा बरोबरच हिंदू बांधव हिरीहीरीने भाग घेऊन ही यात्रा यशसवी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
कोरोना महामारी मुळे बंद असलेली ही यात्रा मोठ्या प्रमाणात या वर्षी भरणार असून यात्रेत नाट्य कलावन्त नृत्य कलावन्त ,या यात्रेत येणार असून नामांकित पहेलवान ही हजेरी लावणार आहेत.ग्रामपंचायत ने यात्रे साठी पुरेपूर व्यवस्था केली आहे.यात्रा यशस्विते साठी सर्वतोपरी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.

0 Comments