नायगाव तालुक्यातील कोपरा ते मरवाळी रस्त्यावर असलेल्या पुलाची बे अवस्था यंदा जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरचा पूल तुटून गेला असताना सुद्धा या संबंधित विभागाचे अधिकारी अध्याप पुलाची दुरुस्ती केली नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन धारकाला पूल बाजूने कसून गेल्यामुळे धोकादायक ठरु शकतो असे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे सदरच्या पुलावर पडलेला खडा या विभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ बुजवून घ्यावेत अन्यथा या विभागातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल असे ही जनतेतून बोलल्या जात आहे
---------------------------------------------------------------------
मरवाळी येथील ओढ्यातील पूल सुद्धा प्रशासनाने अध्याप बांधले नसल्यामुळे येथे रस्त्यावर असे घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? येण्याची शक्यता वर्तवली जात असून या कामासाठी साहित्य येऊन पडले असताना काम चालू करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील कोपरा ते मरवाळी रस्त्यावर असलेला पुल हा मुसळधार पावसामुळे यंदा तुटला असताना ही संबंधित विभागाचे अधिकारी झोपेतच असल्याचे जनतेतून बोलल्या जात असून सदरच्या पुलाची दुरुस्ती अधिकारी करत नाहीत तर नेमके करता तरी काय असा प्रश्न ही जनतेने उपस्थित केला आहेया विभागाचे राजकीय पुढारी बे फिकीर असल्यामुळे अधिकारी चांगले सुस्तावले असल्याचे दिसून येत असून या विभागातील जनतेला जाण्या येण्यासाठी रात्रीच्या वेळेला व दिवसाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सदरचा पुल तात्काळ दुरुस्त करून जनतेची गैरसोय टाळावी असे ही या विभागातील जनतेतून मागणी होत असल्याने कोपरा ते मरवाळी जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने कोपऱ्या जवळील पुलावर मोठा खड्डा पडला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments