Header Ads Widget

नरसी ते उमरी रुई बु मार्गे चालू करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच सौ प्रिंयकाताई निलेश देशमुख यांची विभागीय नियंत्रक राज्य परिवाहन महामंडळ नांदेड यांच्याकडे मागणी !!

  
      माधव पवार
राज्य परिवहन मंडळाची बस जनतेच्या सेवेसाठी नरसी ते उमरी रुई बु मार्गे चालू करण्यात यावी या मागणीसाठी गावच्या सरपंच सौ प्रिंयकाताई निलेश देशमुख यांनी विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नांदेडच्या अधिकाऱ्याना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे
--------------------------------------------------------------------
या मार्गांवर गेल्या वर्षाखाली बडापाड ते भोकर घुंगराळा रुई बु मार्गे सुरळीत चालू होती त्यानंतर औराद ते भोकर रुई बु मार्गेच चालू असताना राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी सदरची बस अचानक पण बंद केली होती
याच मार्गां वरून सन १९८५ ते १९८६ साली सदरच्या बसेच सुरळीत चालू होत्या आणि राज्य परिवहन मंडळाला मोठा फायदा सुद्धा झाला होता याच मार्गांवर सन १९९६ ते ९७ -९८ सालाच्या दरम्यान नांदेड ते धर्माबाद रुई घुंगराळा बळेगाव बस सेवा चालू करण्यात आली होती
---------------------------------------------------------------------
परंतु ही सुद्धा बस सेवा अचानक पणे खोंळबली त्यांच्या नंतर नरसी ते उमरी बस सेवा सुद्धा याच मार्गां वरून चालू होती परंतु राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी रस्त्याचे कारण समोर करून बंद पाडली होती त्यानंतर या मार्गांवर बस सेवा चालूच करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे तालुक्यातील रुई बु मार्गे राज्य परिवहन मंडळाची एक बस बाजार हट्ट करण्यासाठी व प्रवासांना प्रवास करण्यासाठी येत नसल्यामुळे रुई बुच्या सरपंच सौ प्रिंयकाताई निलेश देशमुख यांच्या माध्यमातून या मार्गांवर नरसी ते उमरी तात्काळ बस सेवा चालू करण्यात यावी म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांचे शिफारस पत्र जोडून मुख्य व्यवस्थापक नांदेड यांना पत्र देण्यात आले आहे

गावात लवकरच बस सेवा चालू होईल असल्यामुळे नरसी नायगाव घुंगराळा रुई बु बाळेगाव तळेगाव उमरी या मार्गे दररोज चार फेऱ्या करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असले तरी सदरची सेवा लवकर जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहणार ? आहे

Post a Comment

0 Comments