बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नरसी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पांदण रस्त्याच्या कामासाठी मुरूम ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेल्या जात असताना गावातीलच काही गैर कायाद्याची मंडळी ट्रकटर आडविले असता एका पत्रकारानी गावातील तीन लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे
-------------------------------------------------------------------
आरोपीने त्यांनाच जातीवाचक शिवीगाळ धक्का बुक्की केल्याचा प्रकार घडला असल्यामुळे नरसीच्या माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पांडुरंग भिलवंडे यांच्यासह तिघांजना विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात अॕट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला सध्याच्या परिस्थितीत आरोपी फरार असल्याची माहिती सपोनि संकेत दिघे यांनी दिली आहे
-------------------------------------------------------------------
धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारी वरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान आरोपी गजानन पांडुरंग भिलवंडे,बाळु उर्फ नारायण पांडुरंग भिलवंडे,मारोती बळीराम भिलवंडे यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अॕट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला सदरचे आरोपी फरार असल्यामुळे पुढील तपास जारी करण्यात आला आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील नरसी येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकास केला जातो सदरच्या पांदन रस्त्याच्या कामासाठी मुरूम ट्रॅक्टरने नेला जात होता परंतु येथील माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पांडुरंग भिलवंडे,मारोती बळीराम भिलवंडे,बाळु उर्फ नारायण पांडुरंग भिलवंडे यांनी ट्रॅक्टर अडवून रॉयल्टी काढली का ? असा सवाल करीत तुला वाहतूक करू देणार नाही म्हणून ट्रॅक्टरला आडविले होते असा आरोप ही करण्यात आला आहे
याच नरसी येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास सुर्यवंशी यांनी सदरील तिघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानाच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी देविदास नागोराव सूर्यवंशी वय ४५ वर्ष राहणार नरसी यांनी रामतीर्थ पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

0 Comments