बरबडा बसस्टॅन्ड येथे आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती दिनांक ११ डिसेंबर रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजता साजरी करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुष यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी संचालक कृषी म. शा. सुरेशराव अंबुलगेकर, माजी जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळ नांदेड अध्यक्ष दत्तात्रय आनेमवाड, प्रसिद्ध उदयोजक मारोतराव कंठेवाड, बालाजी नागमवाड, मुदखेड चे नायब तहसीलदार संजय नागमवाड, माजी प्राचार्य व्यंकटराव सुरेवाड, सुधीर राऊतवाड, बालाजी कंठेवाड आदी यावेळी उपस्थित होते
सोपानराव मारकवाड, सुभाष कास्टेवाड, आलबलवार , रावसाहेब पुपलवाड, सौ.भागीरथी मारोतराव बच्चेवार, धोंडिबा बंटेवाड या मान्यवर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी समाजातील सेवा निवृत्त कर्मचारी व नवीन रुजू झालेले कर्मचारी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवरांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आला. अनेक मान्यवराने आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जिवन चरित्रावर सविस्तर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या अडचणी ज्या आहेत जाती प्रमाणपत्र आणि जात पडताळणी संदर्भात आपण एकीने उठाव करून प्रश्न सोडवू शकता असे सांगितले.
जयंती मंडळाचे अध्यक्ष योगेश आलमवाड, उपाध्यक्ष अवधुत पुपलवाड, सचिव ज्ञानेश्वर सुरेवाड, सहसचिव दिपक भुत्ते, कोषाध्यक्ष इरन्ना तिपलवाड, सहकोषाध्यक्ष मारोती मैसनवाड, सदस्य मारोती मेडेवाड, सुधाकर सुरेवाड, माधव सुदेवाड, आनंदा सुरेवाड, ऋषिकेश आलमवाड या कार्यकारिणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
---------------------------------------------------------------------
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव आलमवाड तर उत्कृष्ट सूत्रसंचालन एन. एम. तिप्पलवाड यांनी केले.
---------------------------------------------------------------------
नांदेड़ जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पडत असल्यामुळे मन्नेरवारलू समाजाच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त बसस्टॅण्ड बरबडा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे यांनी प्रथमतः रक्तदान देऊन सुरवात केली त्यात ४० जणांनी रक्तदान केले त्यात ४ महिलांनी रक्तदान करून एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे त्यांचे कौतुक मान्यवरांनी केले.

0 Comments