नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्यामुळे या सदरच्या निवडणुकी दरम्यान पार्टी प्रमुखासह उमेदवारां कडून मतदारांना मोठ्या प्रमाणात मते वळविण्यासाठी बनवाबनवी करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे
गेल्या अनेक वर्षा पासून गावाचा विकास झालेला नसल्यामुळे ते करून दाखविण्यासाठी आम्हाला निवडून देऊन एकबार संधी द्या आणि विकास करून घ्या असे ही निवडणुकीच्या रणधुमाळीतील वास्तव चित्र पहावयास मिळत आहे
-----------------------------------------------------------------
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा चांगलाच रंग व वातावरण आपल्या असल्यामुळे सदरच्या निवडणुकीदरम्यान आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सदरच्या पार्टी प्रमुखांना तारेवरचे कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून सदरच्या निवडणूक अटीतटीच्या होत आहेत
-------------------------------------------------------------------
निवडणुकीत उमेदवाराला तेवढी काळजी नाही परंतु पार्टी प्रमुखांना मात्र आपले पॅनल विजय होण्यासाठी रात्रंदिवस मोठी कसोटी करावी लागत असल्यामुळे व मतदाराचे मने वळविण्यासाठी व मतदान करून घेण्यासाठी अनेकांना विनवणी करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
-------------------------------------------------------------------
सदरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये नोटाच्या बटनामुळे सुद्धा उमेदवारांना काळजी घेण्याची गरज असल्यामुळे बऱ्याच पैकी मतदारांना समजावून सांगण्याची वेळ येत असल्याने नोटा मुळे घाटा होऊ शकतो हे सरळ सरळ वाक्य काही लोकांना समजावून सांगावं लागत असून ग्रामपंचायतच्या निवडणुका मोठ्या अटीतटीच्या होत आहेत पार्टी प्रमुखासह उमेदवार यांनी मतदाराच्या घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी विनवणी करत आहेत
ग्रामपंचायतच्या निवडणुकीला चांगलाच रंग भरत असल्याचे वास्तव चित्र नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये दिसून येत आहे

0 Comments