नायगाव प्रतिनिधी :- मधुकर जवळे -:
नायगाव नगरपंचायतच्या महिला नगरअध्यक्षाचा राजीनामा ? कोणाच्या ही दबावाला बळी न पडता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला सुपूर्त केला असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजचे नायगाव तालुका प्रतिनिधी यांना मिळाली आहे
---------------------------------------------------------------------
गेल्या काही महिन्याखाली नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदरच्या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता प्रस्थापित झाल्याच्या नंतर या नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ गीताताई नारायणगाव जाधव ह्या चांगल्या प्रकारे कारभार सांभाळल्याच्या नंतर अचानक पणे जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे
--------------------------------------------------------------------
विद्यमान नगर अध्यक्षा सौ गीताताई जाधव दिलेल्या राजीनाम्यात असे नमूद केले की कौटुंबिक कारण व कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता नगर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना राजीनामा मजूर करण्यासाठी सुपूर्त करण्यात आला आहे नायगाच्या नगराध्यक्षाचा राजीनामा नगरपंचायतीच्या महिला नगराध्यक्षा सौ गिता नारायण जाधव यांनी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे राजीनामा देण्यात आला असून नायगावच्या नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असताना सुद्धा अवघ्या दहा महिन्यां मध्येच काँग्रेसच्या नगराध्यक्ष सौ गीताताई नारायणराव जाधव यांनी राजीनामा दिला ? आहे
जिल्हाधिकारी यांना दिलेले राजी नाम्यात महिला नगरअध्यक्षा असे नमुद केले की मी माझ्या स्वख़ुशीने आणि कोणाच्या ही दबावाखाली सदरचा राजीनामा देत नाही मी माझ्या कौटुंबिक करणामुळे सदरचा राजीनामा देत असल्याचे त्यांच्या स्वाक्षरीसह सौ गीताताई नारायणराव जाधव यानी राजीनामा सादर केला आहे

0 Comments