Header Ads Widget

केदारवडगाव येथे 'मोशी कृषी प्रदर्शन' आणि येथील शेतकऱ्यांची अभ्यास सहलव शेतकरी करणार नवीन शेती तंत्रज्ञानाचा अवलंब !!


     
पाटोदा : अनिल ढवळे - 

बिलोली तालुक्यातील संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक - नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती पथावर असलेल्या हवामान बदल अनुकूल प्रकल्पाअंतर्गत केदारवडगाव तालुका नायगाव येथील प्रगतीशील शेतकऱ्यांची दोन दिवशीय पाणलोट अभ्यास सहल मोशी पुणे येथून आयोजित करण्यात आली. या अभ्यास सहलीसाठी केदारेश्वर पाणलोट समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व प्रगतीशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे 
------------------------------------------------------------------
एकात्मिक पद्धतीने पाणलोट विकास, हवामान बदल अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास व्हावा या उद्देशानेहि सहल आयोजित करण्यात आली होती.
-------------------------------------------------------------------
मोशी येथे पंधरा एकर परिसरात असलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे सादरीकरण आदींची माहिती शेतकऱ्यांनी घेतली आहे 

या कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, पशुधन जैव, ऊर्जा, रोपवाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार दालनातील स्टॉलची  शेतकऱ्यांनी पाहणी करून  या प्रत्येक गोष्टींची माहिती घेतली. 
-------------------------------------------------------------------
पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या ६० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे ठरले होते . भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थांचाही कृषी प्रदर्शनात सहभाग होता 

 बाजार भाव जलव्यवस्थापन, शेतीमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना आदींची माहिती मिळाली आहे

""""""""" कृषी विज्ञान बारामती येथे भेट""”"

मोशी येथील कृषी प्रदर्शनानंतर  कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध हवामान अनुकूल पीक प्रात्यक्षिक व पीक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संतोष गोडसे यांनी  माती परीक्षण, रोपे लागवड तंत्रज्ञानाचा वापर व पोलीहाऊस, मत्स्योत्पादन,  पाण्याचे नियोजन, कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ शेती आदी उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे 

या सहलीत  संस्थेकडून संगमेश्वर शिवशेट्टे, किशन जाधव तसेच पाणलोट समिती अध्यक्ष शिवाजी जाधव आदींनी सहभाग घेतला आहे 
-------------------------------------------------------------------
कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी यावर ही माहिती केदारवडगाव येथील शेतकऱ्यांना मिळाली आहे .त्यात कृषी प्रदर्शन मोशी येथे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या नवनविन तंत्रज्ञानाची, यंत्रांची माहीती घेतली त्यात, मळणी यंत्र. चारा यंत्र,  सोयाबीन,भात , गहु मळणी यंत्र व रोहीत कृषी यांचे  पेरणी यंत्र, पाणी व्यवस्थापनासाठी मोबाईल कॉलद्वारे स्वयंचलित  मोटार स्टार्टर, फिनोलेक्स  व अनेक कंपन्यांची व तंत्रज्ञानाची माहीती घेतली. 

"

Post a Comment

0 Comments