Header Ads Widget

बिलोली उपविभागाच्या महसूल वसुली वर जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली जोमाने वसुली करून तलाठी मंडळाधिकारी यानी आपला तालुका प्रथम आणावा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत


विशेष नायगाव प्रतिनिधी  : बाळासाहेब पांडे :- 

बिलोली उपविभागाच्या महसूल वसुलीचे मंडळाचे काम बऱ्या पैकी झाले नसून या मध्ये जास्तीचे लक्ष घालून, आजून जास्तीचे प्रयत्न करून महसूल वसुली जोमाने करणे आवश्यक असून जिल्ह्यात आपला तालुका प्रथम क्रमांक  मध्ये येण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करा व गावोगाव जाऊन वसुली करा असे सांगितले आहे
-------------------------------------------------------------------
आपला तालुका प्रथम क्रमांक मध्ये येण्या साठी आवश्यक त्या सूचना उपविभागीय अधिकारी बिलोली व तहसीलदार नायगाव गजानन शिंदे ,व श्रीकांत निळे बिलोली,यांना देण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना दिली आहे 
-------------------------------------------------------------------
दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी बिलोली उपविभागातील नायगाव व बिलोली तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी यांची बैठकीला उपस्थिती होते
---------------------------------------------------------------------
बैठकीत नायगाव व बिलोली मंडळात महसूल बुडवून होणाऱ्या अवैध उतखनन व वाळू उपसा या बाबद नाराजी व्यक्त करून त्या सुधारण्या साठी आवश्यक त्या सूचना व कार्यवाही करण्याचे आदेश दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी या वेळी दिली.
-------------------------------------------------------------------
बैठक संपवून बाहेर आल्या नंतर अभिजित राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कोरोनाच्या पार्शवभूमीवर आवश्यक त्या सूचना व ऑक्सिजन प्रमाण या विषयी माहिती घेण्यात आली.असून पूर्व तयारी ही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे

कोरोनाजन्य परिस्थिती सध्या जिल्ह्यात नाही.पण भविष्यात उदभवल्यास त्या साठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.या वेळी बिलोली उपविभागाचे अधिकारी सचिन गिरी,नायगाव तहसीलदार गजानन शिंदे,बिलोली तहसीलदार श्रीकांत निळे,तलाठी संघटनेचे  अध्यक्ष विजय जाधव,यासह नागरिक उपस्थित होते.










   
 
  




Post a Comment

0 Comments