Header Ads Widget

नायगाव तालुक्यात ग्रा.प.निवडणुकीत माजी आ.चव्हाण यांच्या नेत्रत्वात काँग्रेसची सरशी,भाजप नंबर दोन वर राष्ट्रवादी सेनेला मात्र भोपळा :- !!





विशेष
नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 

नायगाव तालुक्यातील पार पडलेल्या आठ ग्राम पंचायतीच्या निकाला वरून अनेक गावांत सता बद्दल तर बहुतांश ग्राम पंचायतीवर माजी आ.वसंत चव्हाण समर्थकानी सरपंच पदा साठी बाजी मारली तर भाजप ने दुसरा क्रमांक पटकावला आहे.राष्ट्रवादी, सेनेच्या दोन्ही गटाला आपले खाते उघडणे जमले नसल्याने काँग्रेस विरुद्ध भाजप हाच सामना ग्रा.प.निवडणुकीत दिसून आला
नायगाव तालुक्यात या टप्यात आठ गावात निवडणुका पार पडल्या सुजलेगाव येथे सत्तांतर झाले असून कुंटुरकर गटाचा माजी आ.चव्हाण समर्थक सुधाकर बकवाड यांच्या गटाच्या  दत्तात्रय आईलवार  यानी सरपंच पदासह ग्रा.प.वर वर्चस्व मिळवत बाजी मारली,तर सातेगाव येथे माजी आ.चव्हाण गटाच्या नीलुबाई गोविंद पामलवाड या विजयी होऊन  सरपंच बनल्या आहेत.रुई,येथे जाधव भगवान यांनी सरपंच पदासह ग्रा.प.ताब्यात घेत बाजी मारली आहे
-------------------------------------------------------------------
बहुचर्चित  व वादग्रस्त पिपंळगाव ग्राम पंचायत मध्ये सता परिवर्तन झाले असून माजी सरपंच किरण कदम यांच्या गटाचा महिसाजी कदम यांच्या गटाने पराभव केला आहे 
-------------------------------------------------------------------
मरवाळी कोपरा येथे सरपंच छाया ताई केशव पवळे यांनी एकतर्फी विजय मिळवत सर्वच जागेवर विजय मिळविला तर आंतरगाव येथे अटीतटीच्या लढतीत भाजपाचे गजानन तोडे यांनी सरपंच पदासह बहुमत मिळवत काँग्रेस च्या शिंदे गटाचा दारुण पराभव केला.ताकबीड येथे ही सता परिवर्तन करीत भाजपच्या  रणजित कुरे यांनी माजी सरपंच शिवराज वरवटे यांच्या गटाचा पराभव केला आहे 
तलंबीड/ गगणबीड येथे सता परिवर्तन करीत भाजपच्या पिराजी दासरवाड यांच्या गटाने विजय मिळविला त्यांच्या सुनबाई जयश्री ज्ञानेश्वर दासरर्वाड या सरपंच पदी विराजमान झाल्या. काँग्रेसच्या सरपंच विजयी उमेदवारांचे युवा नेते रवींद्र वसंत चव्हाण,माजी सभापती संजय आपा बेळगे,श्रीनिवास पा.चव्हाण आदीने यांनी स्वागत केले.तर भाजपच्या विजयी सरपंच उमेदवाराचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी स्वागत केले.
------------------------------------------------------------------
ग्रामसेवक शिक्षकांनी  नातेवाईक पुढे करून गाव घेतले ताब्यात :- 

नायगाव तालुक्यात मरवाळी येथे केशव पवळे यांनी आपल्या पत्नीला सरपंच करून व पिपळगाव येथे महेशवर कदम यांनी नातेवाईक व समर्थक यांना पुढे करून या दोनही ग्रामसेवकाने गावच्या चाव्या हातात घेतल्या तर सातेगाव येथे संजय जाधव या शिक्षकाने आपल्या नातेवाईकांना रिंगणात उतरवुन सता परिवर्तन घडवून आणले आहे.या मुळे नायगाव तालुक्यात राजकीय व्यक्ती मध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments