माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या दोन दुकानावर छापा मारून सदरची दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी दिली असून अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी कुंटूर पोलिसांचे प्रयत्न सफल झाले आहे
बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी विनापरवाना देशी विक्री करणाऱ्यावर कारवाई करत असल्यामुळे सदरच्या दारू विकणाऱ्याचे चांगलेच ढाबे दानवले असून सदरच्या छापे मारीत एकूण जप्त करण्यात आली आहे तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथे अनेक वेळा कुंटूर पोलिसांनी धाडी पे धाडी मारून अवैध साठा देशी दारूचा जप्त केला होता आणि दारू विक्रेत्याला सबक ही शिकविण्यात आली होती परंतु पोलिसांच्या नजरा चुकून देशी दारू विक्री करत असणाऱ्या दुकानावर कुंटूर पोलिसांनी छापा टाकून परत एकदा आरोपीच्या मुस्क्या आवळल्याची माहिती समोर आहेकुंटूर पोलिसांच्या कामगिरीतून छापे मारीत ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनकांबळे आणि खंदारे यांनी
आरोपी साहेबराव मारोती मदेवाड यांच्या कडून २७ बॉटल एकूण किमत १९६० रुपयाची तर आरोपी परमेश्वर राजाराम रेड्डेवाड यांच्या कडून ३९ बॉटल त्यांची किमत २७३० रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

0 Comments