महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे देगलूरचे कार्यकारी अभियंता यांच्या बेजबाबदार पणासह नायगावचे उपाभियंच्या ढिसाळ नियोजनामुळे नायगाव तालुक्यातील
मौजे कृष्णूर युनिटचे सहाय्यक अभियंता यांच्या बेफिकीर पणामुळे रुई बु ची दलीत वस्ती गेल्या चार ते पाच दिवसा पासून काळ्या कोट अंधारात असल्यामुळे दलित वस्तीच्या नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात असून दळण वळनासाठी गावांत जावे लागत आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील मौजे कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या
रुई बु येथील समस्त गावकऱ्याची डीपी म्हणून नोंद असलेली गावठाण्याची थ्री फेजची डीपी शेतकऱ्यांला देण्यात आली आणि बिलासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कनेक्शन तोडले आहेत याच डीपी वरून दलित वस्तीला विद्युत पुरवठा सुरळीत होता आणि सदरची प्रकाशमय होती विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी तात्काळ सिंगल फेज २५ चे तीन डब्बे देऊन लाईट सुरळीत करावी कारण यात्रा चार दिवसावर येऊन ठेपली आहे
-------------------------------------------------------------------
रुई बु येथील दलित वस्तीसाठी सिंगल फेजची डीपी असली तरी जळून गेल्यामुळे थ्री फेजच्या डीपी वरून लाईट सुरळीत होती ते कनेक्शन बिलासाठी तोडल्यामुळे दलित वस्ती चार ते पाच दिवसा पासून नागरिकांना अंधाराची काळी कोट रात्र काढावी लागत असताना सुद्धा या झोपाळू अधिकाऱ्याना कसल्याच प्रकारचा घम लागत नसल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असून सदरचे नागरिक चांगलेच वैताकले आहेत
-------------------------------------------------------------------
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार सदरचे कनेक्शन तोडून टाकल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसा पासून दलित वस्ती काळोख्या अंधारात असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत असून सिंगल फेजचे २५ केव्हीचे तीन डब्बे दलित वस्तीसाठी देऊन घरगुती विद्युत मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अन्यथा सदरचे ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार देण्याच्या तयारी असल्याचे दिसून येत असून वीज चोरी होऊ नये म्हणून सुद्धा सिंगल फेज केबल १५ ते १६ खांबासाठी उपलब्ध करून दयावेत अशी रितसर मागणी होत आहे

0 Comments