बरबडा :- किरण हणमंते : -
नायगाव येथे आज मिलेनियम पब्लिक स्कुल, नायगाव वेळ:सकाळी अकरा वा.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगावच्या वतीने वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा निरीक्षक आशाताई भिसे, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वक्ते प्रा. सुरेश शिरसे नंदनवनकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी.जांभरूणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला ---
आघाडी जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, गजानन पापंटवार, भास्कर पा. भिलवंडे, उमरी पंचायत समितीचे मा. सभापती शिरीष गोरठेकर, सदाशिवराव धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास नायगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ बडूरे यांनी केले आहे.

0 Comments