नायगाव तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथील रहिवासी असलेले प्रकाश गंगाराम वाघमारे यांचे चिरंजीव ऋषिकेश प्रकाश वाघमारे यांची नॅशनल खेळाडू म्हणून दिल्ली येथे नुकतीच निवड करण्यात आली असल्यामुळे ग्रामीण भागातून हा खेळाडू देशपातळीवर पोचला असून सदरच्या स्पर्धेसाठी दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी रवाना होणार असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे
तालुक्यातील वंजारवाडी येथे एका गरीब कुळात वावरात असलेले व फोटो ग्राफीचा व्यवसाय करून नुकतेच काही महिन्याखाली ग्रामसेवक म्हणून प्रकाश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली नुसत्या हलकीच्या परिस्थिती मध्ये प्रकाश गंगाराम वाघमारे यांनी फोटोचा व्यवसाय करून मुलांना महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज असलेले फरगुशन पुणे येथे शिक्षणासाठी ठेवले आहेऋषिकेश प्रकाश वाघमारे यांनी सध्याच्या परिस्थितीत अकराव्या वर्गात शिकत असून त्यांची नॅशनल खेळाडू म्हणून दिल्ली येथे नेमणूक करण्यात आली आहे
वंजारवाडी येथील प्रकाश गंगाराम वाघमारे यांचे चिरंजीव ऋषिकेश प्रकाश वाघमारे हे जिल्हा पातळीसह स्टेट लेवलवरव अगोदर प्रथम क्रमांक मिळवले होते आणि त्यांना ५८ मॅडल मिळाले होते सदरील गावाची लोकसंख्या पाहिली तर दोन ते अडीच हजाराच्या जवळपास असलेल्या गावात हा विद्यार्थी देशपातळीच्या स्पर्धेत भाग घेतला असून त्यांची निवड झाल्यामुळे गावकऱ्यासह त्यांच्या शिक्षकाने त्यांच्या भावी कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments