माधव पवार
नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काहाळा टोल नाक्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे राज्य महामार्ग अनेक समस्यांनी गांजला असून या रस्त्यावर जाणाऱ्या व येणाऱ्या मंत्र्याच्या व संत्र्याच्या दौऱ्यामुळे कल्याण टोल नाका या यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ऐनवेळी जाग येत असते परंतु ह्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले असल्याने ते कधी दुरुस्त करणार असे जनतेतून बोलल्या जात असले तरी सदरच्या मार्गावरील प्रवासी निवाऱ्याची ही बेवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे
तालुक्यातील कल्याण टोल नाक्याच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्य महामार्गावर झाडे लावण्यात आली नाही प्रवासी निवाऱ्याची व्यवस्थित सोय नाही शौचालय बांधण्यात आले नाहीत पाणी पिण्याची सोय करण्यात आली नाही राज्य महामार्गावर असलेल्या गावाजवळ अंडरग्राउंड नाल्या बांधले नसल्यामुळे गावचे पाणी रस्त्या वरूनच वाहत असल्याचे दिसून येत असून हा ढिसाळ नियोजनाचा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कल्याण टोल नाक्याच्या बेजबाबदार पणामुळे सदरचा नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्ग अनेक समस्यांनी गांजला असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेत
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे नांदेड जिल्ह्यात भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून काही दिवसात आगमन होत असल्यामुळे रस्त्या वरील अतिक्रमण काढण्यात येत आहेत तर रस्त्या वरील काही ठिकाणचे खड्डे कल्याण टोल नाक्याच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुजवून घेत आहेत अनेक ठिकाणी राज्य महामार्गावर खड्ड्यात खड्डे पडल्याचे दिसून येत असून घुंगराळ्या सारख्या प्रसिद्ध ठिकाणी बस स्टैंड वर प्रवासी निवारा नसल्याने हा सदरचा निवारा कधी बांधणार असा प्रश्न चर्चेला जात असून कल्याण टोल नाक्याच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी गतिरोधक नाहीत दिशा फलक लावलेले दिसून येत नाही हे वास्तव चित्र आहे
काहाळा कल्याण टोल नाका धारका कडून दररोज लाखो रुपयाची वाहन धारका कडून टोल वसुली केली जाते परंतु राज्य महामार्गाची कसल्याच प्रकारची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे काही वर्षात सदरच्या रस्त्याची वाट लागणार का ? असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात असून फक्त ह्या रस्त्यावर मंत्री येओ की संत्री येओ त्या वेळेसच मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह कल्याण टोल नाक्याच्या यंत्रणेला जाग येत असते मध्यंतर काळात ह्या रस्त्याकडे कोणीही डोळे उघडून बघत नसल्याने कृष्णुर एमआयडीसीच्या कमानी जवळील प्रवासी निवाऱ्याची बेहाल झाली त्या प्रवासी निवाऱ्याच्या भोंवताली मोठया प्रमाणात गवत वाढले आहे
राज्य महामार्गांवर अनधिकृत शासकीय पाट्या विना ढाब्यावाल्याच्या पाट्या डिव्हायडर लावण्यात आल्या त्या काढल्या जात नाही या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे झाक करीत असल्यामुळे अनेक ठीकाणी सदरच्या पाट्या दिसत आहेत परंतु रस्ता सोडून बाजूला असलेले अतिक्रमण काढल्या जात आहेत आणि स्वतःहून व्यवसाय करणारे लोक अतिक्रमण भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने यात्रे दरम्यान काही अडचण येऊ नये म्हणून काढल्या जातं आहे बऱ्याच ठिकाणी गावचे पाणी काहाळा कल्याण टोलनाक्या वाल्यानी नाल्या बांधल्या नसल्यामुळे रस्त्या वरून पाणी जाताना दिसून येत आहे

0 Comments