माधव पवार
प्रशासनाने थेट सरपंच पदाची निवड जनतेतून ठेवली परंतु सरपंच पदाचे आरक्षण कधी जाहीर करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक लढवणाऱ्या सरपंच पदाचे दावेदार बुचकळ्यात पडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे सदरच्या निवडणुका दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असल्यामुळे त्यांचा निकाल दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी जाहीर होत असल्याने खरे तर सरपंच पदाचे आरक्षण कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेतालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात गावांतर्गत चांगलेच राजकारण व वातावरण तापत असल्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण पुरुषाला सुटेल की महिलांना सुटेल ? याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे
प्रशासन या सदरच्या निवडणुकी पूर्वी आरक्षण जाहीर करणार का ? अथवा निवडणुका संपल्याच्या नंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करेल या कडे ही लक्ष लागल्यामुळे सदरच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीचा जोर आत्ता पासूनच कमी जास्त होत असताना दिसून येत आहे
ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे आरक्षण
महिलाना सुटो की पुरुषांना सुटो निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची असा पार्टी प्रमुखाने निर्धार केला असल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याचे चिन्ह ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे

0 Comments