Header Ads Widget

ईकळीमाळ येथे दलित वस्तीत करण्यात आलेल्या सी.सी.रस्त्याची चौकशी साठी दोन दिवसा पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण जारी


     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथील अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा जिल्हा परिषदेची २०२१-२२ अंतर्गत तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा सी.सी.रस्ता हा वेगवेगळा तीन वस्तीतील इस्टीमेट नुसार काम न करता एकाच वस्तीत निधीचा वापर करून निधी हडप करणाऱ्या सरपंच व ग्रामसेविकांच्या  कार्यकाळातील कामांची चौकशी करून चौकशी अंती दोषींवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी दि.१५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आमरण उपोषण जारी करण्यात येत आहे
     
तालुक्यातील ईकळीमाळ येथे २०२१ ते२०२२ या वर्षात जवळपास १३ लाख ५० हजार रुपयांच्या वर निधी मंजूर झाला होता यात  अनु जाती नवबौद्ध घटकांतील आंबेडकर दलित वस्तीत दोन लाख रुपये सी सी रस्ता, नविन दलित वस्तीत दोन लाख पन्नास हजार रुपये व आंबेडकर दलित वस्तीत नऊ लाख रुपये सी सी रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे

इस्टीमेनंट नुसार न करता सर्वच निधी काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सी सी रस्त्यांवर पुन्हा थुका पाॅलिस करुन एकाच वस्तीत वापर करून निधी सरपंच व ग्रामसेविकांच्या मनमानी कारभार करुन हाडप केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे 

विशेष म्हणजे २०२२ निधी हा अनु जाति नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी रस्ता केला असताना ग्रामसेवकानी त्यांच वस्तीतील लोकांना दि.१२ ऑक्टोबर रोजी घरे व झोपडी हटविण्याची नोटीस दिली आहे

सदर निधी हा ईकळीमाळ येथील तिन्हीही वस्तीच्या विकासासाठी मंजूर झालेला होता परंतु ग्रामसेवक यांनी तिन्हीही वस्तीचा निधी नविन दलित वस्ती गट क्रं.२९९ गायरान जमीन येथे अनु जाति नवबौद्ध जातीच्या कुटुंबांची घरे असुन सदरील कुटुंब हे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून तेथे वास्तव्यास राहत असल्यामुळे ग्रामसेवक यांनी गट क्रमांक २९९ मध्ये समाज कल्याण विभागांचा १३ लाख पन्नास हजार रुपये निधी हा तिन्हीही वस्तीत वापर न करता एकाच सी सी रस्त्यासाठी वापर केला आहे.


Post a Comment

0 Comments