माधव पवार
राजकीय पुढाऱ्यासह या भागातील जनतेचे लक्ष नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगावच्या ग्रामपंचायत निवडणूकीकडे लागले असल्यामुळे या गावातील सदरचो निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
सदरच्या ग्रामपंचायतची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात म्हणजे दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान आणि दिनांक २० डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत असल्यामुळे या गावांत अनेकाची जोरदार तयारी चालू आहेराजकीय पुढाऱ्यासह जनतेचे लक्ष आंतरगावच्या ग्रामपंचायत निवडणूकीकडे असल्यामुळे लक्ष वेधी ठरणार ? - सरपंचाची खुर्ची रिकामी असल्यामुळे या खुर्ची हक्कदार कोण असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले व सदरची निवडणूक मात्र अतिशय अटी तटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून या अनेक जन निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याची मात्र तालुक्यात चर्चा सध्या तरी चालू आहेतालुक्यातील आंतरगावची ग्रामपंचायत ही अगोदर पासूनच लक्ष वेधी ठरत असते आणि आता या गांवात नवं तरुणांनाची फळी निवडणुकीत निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाली असल्यामुळे अधिक सदरची निवडणूक रंगणार असल्याचे बोलल्या जात असून या गावची ग्रामपंचायत ही राजकीय पुढाऱ्याना सुद्धा डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे

0 Comments