Header Ads Widget

देशाच्या एकतेसाठी क्रांती कारानी आपल्या प्राणा आहुती दिली तशाच पद्धतीने भारत जोडोच्या पद यात्रेत सेवा दलाच्या नेत्यांनी वीर मरण स्विकारले


      माधव पवार 
भारत जोडो या पद यात्रेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पदयात्रा नांदेड जिल्ह्यात धडकल्याच्या कृष्णकुमार पांडे यांनी यात्रेत झेंडा तुकडीचे संचालन केले पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला असल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रुग्णालयात जाण्या पूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला या भारत भूमीसाठी रक्षणासाठी क्रांती विराने आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच पद्धतीने कृष्णकुमार यांनी देशाच्या एकतेसाठी वीर मरण स्विकारले आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे चिरंजीव मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी भारत जोडो पद यात्रेची जय्यत तयारी केली या पद यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे बालाजी मदेवाड, माजी प्राचार्य मनोहर पवार, पंढरी कमठेवाड, रुई बु येथील काँग्रेसचे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांच्यासह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णूर, कुंटूर फाटा, वजीरगाव फाटा येथे नायगाव येथून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पद यात्रा यात्रेचे आगमन होणार असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले व रुई बु बिटचे जेमादार कुमरे, पोकॉ घुमे आणि बरबडा बिटचे जेमादार निखाते, पोकॉ सोनकांबळे, पोकॉ कंधारे यांनी कडेकोट पोलीस राज्य महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे 
भारत जोडो यात्राः महाराष्ट्र नांदेड जिल्हा बुधवार, दि. ९ नोव्हेंबर २०२२ स. ५.४५ वा. शंकरनगर रामतीर्थ पदयात्रा प्रारंभ स. ६.२० वा. किन्हाळास. ६.३० वा. हिप्परगा माळ स. ७.२५ वा. नरसी स. ८.२५ वा. नायगाव बाजार स. ९.३० वा. कुसुम लॉन्स, नायगाव येथे राखीव सकाळच्या सत्रातील प्रवास दु. ३.०० वा. कुसुम लॉन्स, नायगाव दु. ३.४० वा. देगाव फाटा दु. ३.५० वा. पळसगाव फाटा दु. ४.४० वा. गगनबीड फाटा सायं. ५.०० वा. घुंगराळा सायं ५.२० वा. कृष्णूर एम आय डी सी कॉर्नर मिटिंग दुपारच्या सत्रातील प्रवास करण्यात येणार आहे 

Post a Comment

0 Comments