नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खंडोबारायाच्या यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्त्याचा सामना रंगला सदरच्या कुस्त्याच्या कार्यक्रमासाठी नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासह बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांची विशेष उपस्थिती होती यावेळी गावकऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आहेनांदेड जिल्हा व नांदेड जिल्ह्याच्या बाहेरील व पंजाब येथून घुंगराळा येथे कुस्त्या खेळण्यासाठी पैलवानाची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि सदरच्या जंगी कुस्त्यांचा सामना छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत रंगला सदरच्या कुस्त्या पाहण्यासाठी लोकांनाची गर्दी जमली असल्याचे दिसून आले आहे
घुंगराळा येथे अखेरची सन्मानाची कुस्ती खंडोबा केसरी रु.२१ हजार १११ रुपयाची कुस्ती हरियाणा राज्यातील रहिवासी असलेला पैलवान नरेश ठाकूर राहणार दिल्ली आणि दिगंबर भूतनर राहणार भूतनर सावंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्यात कुस्तीचा सामना रंगला असून अखेरची ही सदरची कुस्ती खंडोबा केसरी ही कै माधवराव आत्माराम पाटील सुगावे यांच्या नावाने दर वर्षी लावल्या जाते
तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा रायाची यात्रा मोठ्या उत्साहाने भरत असते या कुस्त्यांच्या जंगी सामन्यां मध्ये विविध प्रकारचे पैलवान मोठ्या ताकतीने व मेहनतीने कसरत करून लंगोट घालून दंड मारतात अशा या यात्रेचे स्वरूप माळेगाव यात्रेच्या नंतर ही जत्रा दुसऱ्या क्रमांकावर ग्रामीण भागात भरते असते आणि सदरच्या यात्रेला येणाऱ्या व कुस्त्या खेळणाऱ्या पैलवानाला मोठया प्रमाणात दर वर्षी बक्षीस देण्यात येत आहे
सदरच्या खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगलीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलिस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार कुमरे, घुमे, निकम, पांचाळ, पाटील, मुद्देवार यांनी कोट बंदोबस्त ठेवला आणि घुंगराळा येथील भव्य जंगी कुस्त्याचा रणसंग्राम अतिशय शांततेत पार पडल्या आहेत

0 Comments