Header Ads Widget

पुणे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या राज्य व्यापी अधिवेशनास बरबडा सर्कलचे पत्रकार संघ जाण्यासाठी सज्ज !!

     माधव पवार
पुणे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या राज्य व्यापी अधिवेशनास बरबडा सर्कलचे पत्रकार संघ जाण्यासाठी सज्ज  झाले असल्याचे जेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली असून नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी पुणे येथे होत असलेल्या मराठी पत्रकार संघाच्या राज्य व्यापी अधिवेशनाला उपस्थित राहावे असे बरबडा सर्कलच्या पत्रकारानी केले आहे 
पुणे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशनास जाण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कलचे पत्रकार तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गंगाधर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बरबडा सर्कल प्रमुख चंद्रकांत सूर्य तळ यांनी नंबर वन महादेव फोटो स्टुडिओ बरबडा बालाजीराव शेवाळे यांच्या कार्यालयात सदरची बैठक आयोजित करण्यात आली आहे

पुणे येथे होत असलेल्या राज्य व्यापी अधिवेशनास बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड, भास्करराव धर्माधिकारी बरबडेकर, प्राचार्य मनोहर पवार,दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर,सरपंच माधवराव कोलगाणे,मनोज पाटील मोरे यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा !!

तालुक्यातील मौजे बरबडा येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विविध विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकार बापूराव बडूरे, ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे, ज्येष्ठ पत्रकार बालाजीराव शेवाळे  बरबडा सर्कल प्रमुख चंद्रकांत सूर्य तळ, पत्रकार देविदास जेठेवाड, पत्रकार अनिल ढवळे, आदी पत्रकारांची या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती

या बैठकीदरम्यान पुणे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशनास बरबडा सर्कलचे पत्रकार जाण्यास सज्ज झाले आहेत 


Post a Comment

0 Comments