नायगाव फास्ट न्यूज :- हिंगोली / नांदेड / नायगाव /-
माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जातेय. ही यात्रा कन्या कुमारी पासून सुरु झाली असून काश्मीर पर्यंत जाणार आहे ही पदयात्रा आहया यात्रेत राहुल गांधी सर्व सामान्यां पर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळताना दिसतंय. कारण राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्र पक्ष असलेला शिवसेना पक्षही सहभागी झाले आहेत
भारत जोडो यात्रा सध्या नांदेड मधून हिंगोलीत पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले. राहुल गांधींच्या या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहे
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातला पाचवा दिवस आहे. या यात्रेला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणखी काही नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसच्या मंत्र्यांच्या सत्तेत असून आपल्याला महत्त्वाच्या निर्णयांबाबत विचारलं जात होते आणि काँग्रेस नेते मंडळी खूष होती
राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार नाही. पण तरीही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र असल्याचे दिसत आहेत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध खरंच तितके जवळचे आहेत याबाबत अनेकानी मत व्यक्त केले जातं आहे
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना स्वत:च्या पक्षात बघायचा सल्ला दिला होता. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांची काळजी करु नये, असा टोला नाना पटोलेंनी लगावला होता

0 Comments