Header Ads Widget

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे पाचवी व आठवी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

बरबडा :- किरण हणमंते - 
बरबडा :- येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा इयत्ता 8 वी मधील विद्यार्थी आणि पाचवी मधील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कडून घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये पात्र झाले आहेत
त्यामध्ये पाचवीतील  कु. तेजस्विनी संतोष एडके, कु. प्राप्ती विरभद्र सुपारे, सुमित शिवराज देशमुख, कु.आकांशा अजय शिंदे हे सर्व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू शाळेतून उत्तीर्ण झाले आहेत.

तर  कु. रोशनी किरण हनमंते हिने सहावी मध्ये प्रवेश या शाळेत घेतलेला आहे. परंतु पाचवी ची स्कॉलरशिप परिक्षा महात्मा फुले शाळा बाबा नगर नांदेड येथून उत्तीर्ण झाली आहे. त्यामध्ये आठवीतील कु. साक्षी श्रीपत जाधव, कु.पद्मजा संजय व्यंकटपूरवार, कु.प्रेरणा प्रभाकर शेंडगे, कु.पूजा नागोराव पटेमवाड या सर्व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर व सर्व संचालक मंडळ यांनी व शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे , पर्यवेक्षक सुर्यकांत  फड , ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक शिंदे, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, प्रा. वाघमारे, एन. टी. तिप्पलवाड, सुर्यकांत गायकवाड, संतोष पचलिंग आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments