Header Ads Widget

शेतकऱ्याच्या हिवाळी लागवडीसाठी बारूळच्या मनार प्रकल्पाचे पाणी कॅनल दुरुस्त करून सोडण्याची मागणी !!


      माधव पवार
कंधार तालुक्यातील बारूळच्या मनार प्रकल्प तळ्याचे पाणी नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी कॅनलची दुरुस्ती करून सोडण्यात यावी अशी मागणी शेतकरी गटातून केली असल्यामुळे अध्याप तरी बारूच्या तळ्याचे पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे
सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर वर्षी कॅनलची दुरुस्ती करतात परंतु सन १९८३ ते ८४ सालाच्या दरम्यान या तळ्याचे पाणी बळेगाव टेल पर्यंत जात होते परंतु आता या विभागा मार्फत दरवर्षी थातूरमातूर काम करण्यात  येते असल्यामुळे टेल पर्यंत पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेवट पर्यंत पाणी सोडावे शेतकऱ्यानी मागणी केली आहेआणि अनेक ठिकाणी कॅनल फुटलेले असून हे प्रथम दुरुस्त करण्यात यावे रुई परिसरात अनेक ठिकाणी कॅनलची दुरुस्ती करणे बाकी असल्याने सदरच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कॅनल फुटलेल्या ठिकाणी भरून घेऊन बळेगावच्या शेतकऱ्याला पाणी पुरेल अशा पद्धतीचे नियोजन करण्याची मागणी होत आहेदरवर्षी तरी बारूच्या तळ्याचे पाणी बळेगाव पर्यंत सोडण्यात यावे नायगाव तालुक्यातील फक्त रुई पर्यंत पाणी येते परंतु कमी दाबाने येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी पुरत नाही पुरत असले तरी सदरचे पाणी ज्या ज्या ठिकाणी कॅनल फुटलेले आहे
---------------------------------------------------------------------
त्या ठिकाणातून थेट गोदावरीच्या पात्रात पाणी बारूच्या तळ्याचे वाहताना दिसून येते अनेक वेळा या संदर्भात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी पाणी सोडण्याच्या संदर्भात मागणी केली आहे

कंधारच्या व नायगावच्या प्रशासनानी सदरची मागणी धुडकावून लावून फुटलेले कॅनल भुजवीत नाहीत अतिशय ही गंभीर बाब असल्याचे ही शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments