बरबडा :- किरण हणमंते :=
ग्रामपंचायत कार्यालय बरबडा सभागृहात आमच गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी गणस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी बरबडा नगरीचे सरपंच माधव केरबा कोलगाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ठिकाणी पंचायत समिती नायगावचे विस्तार अधिकारी लतीफ शेख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. गच्चे, ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत बोंडले, तलाठी संदिप पवार, जिल्हा परिषद शाळा मधील केंद्रिय मुख्याध्यापक सायबू गुंटे, आदी उपस्थित होते
जिल्हा परिषद कन्या शाळा मुख्याध्यापक खंदारे, ग्रामपंचायत सदस्य गौतम हनमंते, गंगाधर रुद्रवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका कमठेवाड, आशा वर्कर पर्यवेक्षिका अर्चना चुनूकवाड, प्रल्हाद जेटेवाड इत्यादी सह या गणातील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर, यांच्या सहित अनेकांची उपस्थिती होती
या ठिकाणी मार्गदर्शन करताना विस्तार अधिकारी लतिफ शेख यांनी पंचायत समिती अंतर्गत बरबडा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत आमच गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत गण स्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेत बोलत होते. पुढे बोलताना सांगितले कि, गावचा विकास आराखडा तयार करीत असताना गट संसाधन व्यक्ती उपस्थित होते
सरपंच आणि ग्रामसेवक यांनी समाजातील सर्व घटकाचा विचार करून शास्वत विकासाची नऊ ध्येया प्रमाणे शास्वत आराखडे तयार केल्यास गावचा सर्वागीण विकास घडवून आदर्श गाव निर्माण करता येईल असे मत व्यक्त केले.
त्यानंतर अनेकांनी आपले मत मांडले आणि आपल्या समस्या मांडून समाधान करून घेतले. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना वरच्या स्तरावरून येणाऱ्या योजना राबविणार असल्याचे सरपंच माधव कोलगाणे यांनी सांगितले. नंतर आभार ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत बोंडले यांनी केले.

0 Comments