Header Ads Widget

भोकर हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने माहुर लवकरच बस चालु होणार जवळगावकर

हिमायतनगर :  नागोराव शिंदे :- 

आ.माधवराव पाटील जवळगावकर माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळ यांनी भोकर माहुर मार्गे हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने बस सुरू करण्यासाठी विभागीय वहातुक अधीकारी म.रा.प.महामंडळ दि१६.११ २००२२रोजी निवेदन देण्यात आले होते

आ.माधवराव पा.जवळगावकर यांची ग्रामीण पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी भेट घेऊन भोकर हिमायतनगर पळसपुर ढाणकी उमरखेड मार्गाने माहुर बस चालु करण्यासाठी नांदेड विभागीय वहातुक अधीकारी यांच्या कडे निवेदन दिल्याची माहिती दिली
त्या वेळी तात्काळ दखल घेऊन विभागीय वहातुक अधीकारी यांच्यासी फोन वरुन संपर्क साधला असता भोकर माहुर बस सुरू करा असी माहिती दिली विभागीय वहातुक अधीकारी यांनी तीन चार दिवसांत चालु करण्यात येईल असे आ माधवराव पाटील जवळगावकर यांना सांगितले 

भोकर माहुर मार्गे हिमायतनगर ढाणकी उमरखेड बस या पुर्वी चालु करण्यात आली होती परंतु कोरोणा आणि कर्मचारी यांच्या संपामुळे बंद होती
या बसमुळे या भागातील भाविकांना दर्शनासाठी माहुरला जाण्यासाठी सोईचे होईल त्याच प्रमाणे हिमायतनगर ढाणकी उमरखेड महागाव बाजारात पेठा असल्याने व्यापारी विद्यार्थी भावीकाच्या सोईची होऊन महसूल सुद्धा मिळेल

भोकर माहुर व बिलोली माहुर बस चालु करण्यासाठी माधवराव मीटकरे प्रवाशी  मंडळ ढाणकी यांच्या सहकार्याने शेख इरफान ढाणकी, नाथा पाटील कुर्हे ,हिरासिंग चव्हाण, बाबा खान ढाणकी, चांदराव वानखेडे पळसपुर यांनी निवेदनात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments