Header Ads Widget

कृष्णूर येथील व्यंकेज इंडिया लिमिटेड कंपनीचे मॅनेजमेंट टकाटक - आपत्कालीन काळात सर्व सुविधा उपलब्ध सुरक्षासह स्वछता कायम !!


    
       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत असलेल्या व्यंकेज इंडिया लिमिटेड कंपनीचे मॅनेजमेंट अतिशय टकाटक व महत्त्वपूर्ण चालत असल्यामुळे सदरच्या कंपनीची कार्यप्रणाली सुरळीत चालत असल्याचे दिसून येत आहे

या कंपनीत आपत्कालीन काळात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने व सुरक्षा व स्वच्छता कायम स्वरूपी राबवत असल्याने कंपनी सुरळीत चालत असल्याचे ही बोलल्या जात असून सदरची कंपनी ही कृष्णुर एमआयडीसी मध्ये लक्ष वेधी ठरली आहेतालुक्यातील कृष्णुर एमआयडीसी अंतर्गत असलेली  व्यंकेज इंडिया लिमिटेड कंपनीत स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यां बरोबर लेबरचे मॅनेजमेंट या अनुषंगाने इ एस आय फ्री ( दवाखाना आणि एखाद्या वेळेस बर्निंग लागली तर आग विझविण्यासाठी सदरची आग बाहेर जाऊ नये म्हणून फायर फायटरची सुविधा करण्यात आली आहे

कंपनीत काम करणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांना दोन वेळा चहा पाण्याची सुविधा करण्यात आली असून येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी शूज डोक्याला मार लागू नये म्हणून कंपनीने हेल्मेटची सुविधा करून दिली असल्यामुळे कर्मचारी व्यवस्थित पणे काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहेकृष्णूर येथील एमआयडीसी कंपनी मध्ये व्यंकेज इंडिया लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वतीने कंपल्सरी यनिफॉर्म अर्थात कंपनीचे कपडे देण्यात आले आहेत

कंपनीत कर्मचाऱ्याची अधिक सुविधा पाहिली तर येथील येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वतीने वाहनाची सुविधा करण्यात आली असून सदरची सुविधा तीन ते चार वेळा करण्यात आल्याचे ही सांगण्यात येते सदरील कंपनीचा आर्थिक व्यवहार सुद्धा सुरळीत असल्याने मोठ मोठाले व्यापारी गट  कंपनीकडे सोयाबीन देण्यासाठी धजावत असतात असे ही सांगण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments