माधव पवार
बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील रहिवासी असलेल्या हुलूबाई लक्ष्मणराव काळेवार वय पन्नास वर्षे ह्या शेता कडून गवताचा भारा घराकडे घेऊन येत असताना अचानक दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी संध्याकाळी चार ते साडेपाच्या अंदाजात आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसासह विजेचा कडकडाट झाला आहे
चिटमोगरा येथील महिलेचा त्यात विजेचा कडकडात वीज निर्माण होऊन सदरील महिला येते वेळी खंडोबाच्या मंदीरा जवळ वीज पडल्यामुळे वाटेतच सदरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना घडली असल्याचे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी सांगितले आहे
रामतीर्थ पोलिसांनी सदर महिलेचे प्रेत ताब्यात घेऊन आणि नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती सपोनि दिघे यांनी दिली आहे

0 Comments