Header Ads Widget

हिमायतनगर  : नागोराव शिंदे  -

हिमायतनगर  शहरातील मुख्यरस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात मोकाट असलेले गाय,बैल,रेडा,वासरु वळु,गाढवे,शेळ्या,मेंढ्याआदि अनेक लहान-मोठे जनावरे शहरातील परमेश्वरमंदिरासमोर,कमानीसमोर,बाजार रोड वर,चौपाटी परिसर किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्गावर उमर चौक डॉ आंबेडकर चौक बसस्थानक परिसरात पळसपुर रोडवर,पारडी रोडवर,सदाशिव मार्केटकडे

जाणाऱ्या रस्त्यांवर आदी परिसरात या ठिकाणी पाच ते दहा जनावरांचा कळप नेहमीच या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसत असताना स्थानिक प्रशासनाचे की जनावराच्या मालकाचे दुर्लक्ष आहे
सदरचा जनावराचा कळप हा रस्त्यांच्या मध्यभागी उभा असतो अथवा चालत असतोत्या भरस्त्यावर जनावराचा कळप उभा टाकून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन धारकप्रवासीवर्गाला पायी चालणाऱ्या वृद्धांना महिलांना पुरुष तर शाळकरी लहान मुलां-मुलींना याचा दररोजच नाहक त्रास होतआहे

शहरातील रस्त्यावरून तीन चार चाकी वाहन घेऊन जात असताना,या वाहनांना धडक देऊन लहान मोठे अपघाताचे प्रमाण दररोज दररोजच होत मोकट जनावरांमुळे शहरासह तालुक्यातून आलेल्या प्रवासी वर्गांना सुद्धा यांचा नाहक त्रास नेहमीच होत असून मोकाट जनावरांना नगरपंचायतीचे सार्वजनिक जनावरे कोंडण्यासाठी कोंडवाडा बंद किंवा कोंडवाडाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी जनावरे कोठे कोंडावे ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे
नगरपंचायतीकडे कोंडवाड्यांसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून जनतेला नाहक त्रास देण्याचे काम नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे करीत असल्याचा गंभीर आरोप येथील जनतेतुन बोलल्या जात आहे 

शहरात मोकाट जनावरामुळे नेहमीच ट्राफिक जामचा सुद्धा त्रास होऊन किमान अर्धा-अर्धा तास तरी रहदारी व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी बोलून दाखविली आहे.





Post a Comment

0 Comments