Header Ads Widget

नायागांव तालुक्यातील औराळा येथील प्रकरण उपोषाच्या विरोधात उपोषण गावकऱ्याचे उपोषण मागे तर एकाचे चालूच ? -

   
       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे औराळा ग्रामपंचायतच्या चौकशीसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यलया समोर किरण वाघमारे यांचे उपोषण चालू असतानाच त्यांच्या 
विरोधात गावातील लोकांनी जिल्हाअधिकाऱ्याना निवेदन देऊन उपोषणास बसले होते परंतु गावकऱ्याचे उपोषण प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केल्याच्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले तर सदरच्या कार्यालया समोर कार्यकर्त्याचे उपोषण चालू असल्याचे सांगण्यात येत खरे तर सदरचे प्रकरण काय ? चौकशी का केली जातं नाही केली तर त्यात काही निस्पन्न होत नाही तरी उपोषण कशासाठी हा विषय समोर येत आहे
""" हद्दपारीची कार्यवाही करा प्रकरण तरी काय ?  -""..

जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात सतीश नारायण वाघमारे, साईनाथ गंगाधर पांढरे, गौतम महोन वाघमारे, विठ्ठल अर्जुन गायकवाड, चंद्रकांत गणपती वाघमारे यांनी स्वाक्षऱ्यानिशी निवेदनात केला आहे 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने या तक्रारीची घेऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांना दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी या प्रकरणात योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले होते असे सांगण्यात येते व जिल्हा परिषदच्या पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी यांनी ही नायगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याना चौकशीचे आदेश दिले होते

सदरचे कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केल्या नंतर सुद्धा दोषीच्या विरोधात कारवाई केली नसल्याचा उपोषण कर्त्यांचा आरोप असून वरिष्ठाचे आदेश असताना ही चौकशी करण्यात आली नसल्याचे उपोषण कर्ते किरण वाघमारे यांचे म्हणे आहे
"" औराळा येथील गावकऱ्याचा असा हा आरोप ""

नायगाव खै जिल्हा नांदेड येथील तक्रारदार किरण शंकर वाघमारे यांनी मागील दहा वर्षा पासून सतत जाणीवपूर्वक पैशासाठी ? गावातील विकास कामे करत असताना कामा मध्ये आडथळे निर्माण करणे व गावात विविध समस्या असताना पांदण रस्ता स्म्शान भूमीकडे जाणारा रस्ता सार्वजनिक नळ योजना गावातील लाईट नाली इत्यादी कामे असताना सातत्याने तक्रारी करत आहे

गावातील कोणते ही होत नाहीत तक्रारदार किरण वाघमारे यांनी अधिकारी ग्रामसेवक आणि महिला सरपंच वर्षा सतीश वाघमारे उपसरपंच रेखाताई साईनाथ पांढरे तसेच 
ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील अनेक नागरिकाच्या तक्रारी करत असल्यामुळे गावा मध्ये कोणते ही कामे होत नाहीत आणि कोणताच कर्मचारी गावात येण्यास धजावत नाही व कामे करण्यासाठी तयार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे




 


 

Post a Comment

0 Comments