बरबडा : किरण हणमंते :-
बरबडा येथील ग्रामपंचायत बरबडा या ठिकाणी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना औषधी किटचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे उत्पन्न कशाप्रकारे वाढविले जावे व कमी खर्चामध्ये उत्पादन जास्तीचे कसे वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत बोंडले, कृषी सहाय्यक मोहन मैसनवाड, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोसलवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर रुद्रवाड, प्रसिद्ध व्यापारी सदाशिव पा. पचलिंग अनेक सदस्य कर्मचारी आणि शेतकरी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थिताना कृषी सहाय्यक मोहन मैसनवाड यांनी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी सुनीलजी वरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सर्व किटचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले . शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील कमी खर्चामध्ये उत्पन्नात कशी वाढ केली जाईल याबद्दल सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. सर्वत्र गावकरी मंडळींना या मूल्य साखळी सोयाबीन उत्पादक वाढ योजनेचा लाभ मिळाला असल्याने गावातील सर्व जनतेतून व शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण झालेले आहे.

0 Comments