मंत्री रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार यांच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सोमवार औरंगाबाद ते जालना रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या कार्यक्रमात कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनची पाया भरणी करण्यात येणार असल्यामुळे मा.रावसाहेब पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार आणि डॉ.भागवत कराड वित्त राज्यमंत्री, भारत सरकार मान्यवर अतिथी म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती हाती आली आहे
औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील सदरचा कार्यक्रम हा दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी होणार असून श्री संदीपान भुमरे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री, औरंगाबाद जिल्हा अब्दुल सत्तार, कृषी मंत्री, महाराष्ट्र सरकार; श्री अतुल सावे, सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र सरकार, सय्यद इम्तियाज जलील, माननीय खासदार,
औरंगाबाद; श्री अंबादास दानवे, माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र; माननीय आमदार - श्री सतीश चव्हाण आणि श्री विक्रम काळे; माननीय आमदार - श्री संजय शिरसाट; श्री प्रदीप जैस्वाल,; श्री हरिभाऊ बागडे; श्री प्रशांत बंब, श्री रमेश बोरनारे, श्री उदयसिंग राजपूत आणि इतर लोकप्रतिनिधी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील औरंगाबाद येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
त्या नंतर जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधेसाठी पिटलाईन पाया भरणी समारंभ दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणारअसून अतुल सावे, सहकार मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री, जालना जिल्हा, अंबादास दानवे, माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र; माननीय आमदार - श्री सतीश चव्हाण, विक्रम काळे आणि श्री राजेश राठोड; माननीय आमदार राजेश टोपे, श्री कैलास गोरंट्याल, श्री संतोष दानवे, नारायण कुचे इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments