Header Ads Widget

तिरंगा दुर्गा महोत्सवाच्या रक्तदान शिबिराचे आ.राजेश पवार यांच्या हस्ते उदघाटन ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान


नायगाव विशेष प्रतिनिधी - बाळासाहेब पांडे :- 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तिरंगा दुर्गा महोत्सवाच्या वतीने व भाजप कार्यकर्ते माधव कल्याण यांच्या पुढाकारातून राजुरा हनुमान मंदिर समोर रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी लाल बहादूर शास्त्री व गांधी जयंतीचे अऔचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये तरुण युवकांनी  मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ४७ पुरुष आणि ५  महीलानी अश्या एकूण ५२ रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे  
आयोजक  माधव पाटील कल्याण  यांनी घेतलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशात झालेल्या रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी तिरंगा दुर्गा महोत्सवाच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम  राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नायगाव
 विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी
 पवार होते.या रक्तदान शिबीरास अनेक रक्तदात्यानी रक्तदान केले नांदेड येथील गोळवलकर गुरुजी  रक्त पैढीच्या डॉक्टर्स व कर्मचारी यानी प्रयत्न करीत शिबीर यशस्वी केले 
.या वेळी रक्त दान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे देविदास पाटील बोमनाळे भगवान पाटील लंगडापुरे ,बाबासाहेब पाटील हंबर्डे ,चंदु पाटील चव्हाण अशोक पाटील कल्याण,राजेश पाटील कल्याण,करीम चाऊस ,राजु आप्पा बेळगे,शंकर तमनबोईनवाड,जुनैद पठाण,सय्यद भाई उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी  महोत्सवाचे अध्यक्ष ,माधवराव पाटील कल्याण सचिन पा. कल्याण ,साईनाथ नरवाडे ,ओमकार पांचाळ,  शुभम नरवाडे ,विकी मोरे आदीनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments