Header Ads Widget

ऑगस्ट महिन्यात चोरीस गेलेल्या बैल जोडीसह अज्ञात आरोपीचा तपास जलद करून चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी बैल हस्तग करत तीन आरोपीला केले अटक !!

पूर्णा प्रतिनिधी : सय्यद कलीम :-

पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोदाकाच्या मोजे अजदापूर येथून दिनांक २३ ऑगस्टच्या २०२२ रोजीच्या मध्यरात्री एका शेतकऱ्याच्या शेतातून दोन बैल चोरी गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात होता

चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रकाश पंडित व पोहेका सूर्यकांत केसगिर ह्या चुडावा पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान करून सदरील प्रकरणाच्या गावातील काही व्यक्तींचे धागेद्वारे मिळाल्यामुळे दिनांक २ ऑक्टॉबर २०२२ रोजी ३ आरोपींना अटक केली व दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे

माहिती अशी की तालुक्यातील अजदापूर येथील शेतकरी महादू नरारी हिवरे याचे गावात शिवार शेत आहेआहे दैनंदिन शेतामधील कामे करून दिनांक 23 ऑगस्ट च्या रात्री तो आपल्या घराकडे आला होता परंतु मध्यरात्री त्याच्या शेतातील दोन बैल अंदाजे साठी सतरा हजार रुपये किमतीची अज्ञात चोर त्यांनी आखाड्या वरून चोरून गेली होती आईंन मशागतीच्या अंतर्गत कामाच्या वेळी बैल जोडी चोरून गेल्यामुळे सदस्य शेतकऱ्यांची उघड्यावर पडली होती याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता 

दिनांक २ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी अजदापूर येथील आरोपी राधाजी विश्वनाथ वैद्य महादू साहेबराव वैद्य व तिसरा आरोपी रियासत खान अब्बास खान पठाण राहणार जवळा पांचाळ तालुका कळमनुरी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील तीन आरोपीला न्यायालयात  उभे केले असता न्यायालयाने या तीन आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे 

बैल चोरी प्रकरणाचा कसून तपास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पंडित, पोहेका  सूर्यकांत केसगिरी हे करीत असून सदरच्या आरोपीला अटक केल्यामुळे बैल जोडी मालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

Post a Comment

0 Comments