Header Ads Widget

नायगावात शांततामय वातावरणात ईद ए मिलाप निमिताने पोलीस बंदोबस्तात भव्य मिरवणूक संपन्न !!

नायगाव  : मधुकर जवळे :- 

जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त नायगाव ,खैरगाव, पिंपळगाव येथील मुस्लिम बांधवांनी नायगावच्या दारुल उलूम बनात नुरी प्लॉट येथून दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी मिरणुकीला प्रारंभ करून शहरातील महामार्गावरून डॉक्टर हेडगेवार चौक, शिवाजी चौक ,नुरी चौक मार्गाने मिरवणूक शांततेत हजरत सय्यद वक्कल शहा वली दर्गावर संपन्न झाली आहे
मिरवणूक शहरातून जात असताना सर्व धर्मीय, व्यापारी बांधवांनी जागोजागी मिरवणुकीचे स्वागत करून पाणी पाऊच ,बिस्कीट पुडे, फळे, चॉकलेट, शरबत वाटप करून मिरवणुकीत सहभाग नोंदवला मिरवणूक शिवाजी चौकात आल्यानंतर मदिना मज्जिदचे इमाम हजरत इस्लाम खान मिसबाही यांनी उपस्थित सर्व धर्मियांना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी सांगितले की --

पैगंबरांचा जन्म हा जगात शांती निर्माण करण्यासाठी झाला असून पूर्वीच्या काळात मानवात अराजकता माजवून गेली होती मानवात माणुसकी ,स्नेह, प्रेम वृद्धिगत होण्यासाठी आणि मानवाला शांततामय जीवन जगण्यासाठी मानवाला मानवी संहिता पैगंबरांनी घालून दिली. मानवाला एकमेका विषयी आदची भावना, आपुलकीची शिकवण दिली आहे
यावेळी भव्य मिरवणुकीत सय्यद रहीम शेठ, हाजी अब्दुल्ला सिद्दिकी ,हाजी अब्दुल मजीद बागवान, हाजी नवाज कुरेशी ,हाजी रहमतुल्ला, जामा मजीदचे इमाम मेहबूब साहब ,मदिना मजीदचे इमाम इस्लाम खान मिसबाही, मुफ्ती शाकीर साहब कोलंबी ,इमाम मगदूम मौलाना ,पत्रकार सय्यद मतीन, सय्यद शफी ,महंमदगौस पठाण, सय्यद जाफर, शेख आयुब ,शेख आदम, सय्यद बाबू सय्यदअली मुल्ला, शेख युसुफ मुल्ला ,शेख रफीक शाह, मौलासाब कुरेशी, खैरगाव चे सरपंच सय्यद

मेहताब, शेख चांद चाऊस, अब्दुल करीम चाऊस, हाजी दस्तगीर, शेख अहमद हाजी बडे साहब,, मोहसिन पठाण, मैनोदीन मुल्ला,खयूम, पापामिया, शेख युनूस,मुजाहेद सिद्दिकी, हाजी तोफिक बागवान आदींसह हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक शांततेत संपन्न झाली.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments