माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथे भाजपाचे नेते गजानन पाटील चव्हाण नायागांवकर यांनी राज्याची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मोठया प्रमाणात ग्रामीण भागात रंगत असल्यामुळे नायगावातुन भाजपा पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे
नायगाव येथील भाजपाचे गजानन पाटील चव्हाण
यांनी काही दिवसातच नायागांवात राजकीय भूकंप होण्याचे चित्र जवळ पास स्पष्ट होताना दिसून येत असून भाजपाचे नायगाव विधानसभा अध्यक्ष गजानन पतील चव्हाण यांना शिव बंधन लवकरच बांधले ? जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत
भाजपा कार्याची जबाबदारी (१) बुत प्रमुख (२ ) शक्ती केंद्रप्रमुख (३ ) शक्ती केंद्र पालकत्व ( ४ ) भाजपा नायगाव शहर प्रमुख ( ५ ) भाजपा माजी नगरसेविका प्रतिनिधी नायगाव ( ६ )भाजपा मेरा परिवार ८९ नायगाव विधानसभा अध्यक्ष ( ७ ) जिल्हा परिषद, ८९ विधानसभा नांदेड लोकसभासह स्थानिक स्वराज्य निवडून का अशा अनेक पदभार जबाबदाऱ्या स्विकारले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या थेट संपर्कात भाजपा नेते गजानन पाटील चव्हाण असल्याचे सांगण्यात येते
तसेच सामाजिक चळवळीमध्ये नायगाव सह नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळ व मित्रपरिवार असा मोठा जनसंपर्क गल्ली ते दिल्ली पर्यंत हा असा प्रवास आणि संपर्क असल्यामुळे भाजपाचे गजानन पाटील चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे

0 Comments