नायगाव फास्ट न्यूज थेट मुबंई :-
राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाची शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत असल्यामुळे या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत राजकारणात सगळ्यांनाच " दिघे "होता येत नाही काही जण " शिंदे " होतात दिघे नक्की कोण होते ? असं म्हणत शिवसेनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोलखोल केली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटा मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे
" शिवसेनेत " मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.इथ पर्यंत ठीक पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितलाआहें हे डोके शिंदे यांचे नाही त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान असून छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला पण शिवसेनेवरच दावा करण्याची हिम्मत कोणी केली नव्हती व यापैकी कोणीच दावा केला नव्हता हा असा दावा करणारा शिंदे हा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला, अशी टीका सेनेनं केली आहें
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतलादिघे यांची आठवण शिंदे यांना २१ वर्षां नंतर झाली दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर,असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना प्रश्न पडला कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि शिवसेना फोडली आहें
चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली, असा आरोपच शिवसेनेनं केला आहे

0 Comments