Header Ads Widget

भारत जोडो' यात्रेत मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे - प्रा.रविंद्र चव्हाण एकदिवसीय शिबिरात कार्यकर्त्यांना मान्यवरांचे सखोल मार्गदर्शन

नांदेड विशेष प्रतिनिधी : एस एम मुदखेकर -

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि. ६ नोव्हेंबर रोजी देगलूर मार्गे नायगाव नांदेड जाणार आहे यात्रेच्या पूर्व तयारीची कार्यकर्त्याची बैठक दि १६ ऑक्टोबर रोजी येथील बळवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली आहे 
 या बैठकीत भारत जोडो पदयात्रा ही नांदेड जिल्ह्यात सहा दिवस राहणार असून सहाही दिवस सदरील पदयात्रेत कार्यकर्त्यांनी सहभागी होण्यासाठी नायगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी एक दिवसीय शिबीर घेण्यात येऊन काँग्रेस पदाधिकार्यानी मार्गदर्शन करून  सूचना दिल्या आहेत

त्याचबरोबर काँगेस पक्षाने देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देऊन मोदी सरकारने राष्ट्रीय संपत्तीची कशी विलेवाट लावून महागाईच्या खाईत देशाला लोटल्याचे सांगितले पक्षाच्या बांधणी करिता आणि भारत जोडो यात्रेच्या नायगाव येथील शिबिरात भारत जोडोचे समनवयक जीवनराव देशमुख ,रामराव श्रीमनवार,माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे,प्रा.रवींद्र चव्हाण, आदी उपस्थित होते 
उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, भारत जोडोचे प्रमुख मार्गदर्शक निरशय साक्षत साधना,तुषार रईस हंसदास, तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे, नगरसेवक पंकज चव्हाण, श्रीकांत चव्हाण, गजानन चव्हाण,  डॉ. सौ.मिनाक्षी शिवाजी कागडे, बालाजी मद्देवाड, मनोहर पवार,  पत्रकार एस.एम.मुदखेडकर, शहराध्यक्ष जब्बार खान, अविनाश कदम,सूर्यभान डुबुकवाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
कमिट्याची पुनर्रचना करण्यात यावी तसेच पंचायत समिती गण स्तरावर कमिट्या,आणि पक्ष बांधणीसाठी बूथ कमिटी तयार करण्याच्या सूचना दिल्यात. जिल्ह्यात भारत जोडो यात्रा येणार जास्तीत जास्त प्रमाणात  कार्यकर्ते सहभागी व्हावे असे आवाहन प्रास्ताविकात प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले.पदयात्रेच्या नियोजनात तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब शिंदे, संजय चव्हाण, नवनाथ जाधव, बालाजी शिंदे,नगरसेवक विठ्ठल बेळगे, सूरज शिंदे,रावसाहेब शिंदे, सुरेश जाधव, शंकर चव्हाण, भास्कर ताटे,गोविंदराज आंबटवार आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments